काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘CBI’

संत सोहराबुद्दीन पुण्यस्मरण

 महागाईच्या मुद्यावरून सरकार चांगलेच कोंडीत सापडले होते. अश्या वेळी प्रमुख विरोधी पक्षाला हतबल करून स्वताची सुटका करण्यासाठी कोंग्रेसने जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. ह्याचा एक भाग म्हणून गुजरातच्या गृहमंत्र्यांना एका खोट्या चकमकीच्या आरोपावरून अटक करवून मोदींना अडचणीत आणण्याचे कारस्थान रचले गेले. सरकारची भूमिका, CBI ची कार्यपद्धती आणि सोहराबुद्दीनची पार्श्वभूमी जाणून घेतलीत तर हसावे की रडावे असा प्रश्न पडतो:

  1. सोहराबुद्दीन– गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये २० गुन्हे दाखल असलेला तो एक तस्कर होता. ह्या ४ पैकी २ राज्यात कोंग्रेसचेच सरकार असून स्थानिक न्यायालयांनी सोहराबुद्दीनला दोषी ठरवून अटक करण्याचे आदेश दिले होते. थोडक्यात तो एक ‘Wanted’ गुन्हेगार होता तर मग त्याच्या मृत्यूचा एवढा गवगवा का केला जातोय?. 
  2. पोलीस चकमक– देशात ५००० पोलिक चकमकी घडल्या आहेत आणि त्यापैकी १७०० चकमकीविरुद्ध न्यायालयात खटले प्रलंबित आहेत. असे असतांना CBI ला हा एकाच खटला का उकरून काढावासा वाटला?
  3. पुरावे– सोहराबुद्दीनला २००५ साली पोलिसांनी हैदराबाद-सांगली बस मधून ‘उचललला’ आणि दोन दिवसांनी अहमदाबादला नेताना त्याला ‘उडवला’ असा आरोप आहे. आणि पुरावा म्हणून त्या बसमधल्या प्रवास्यांचे जबाब नुकतेच नोंदवले आहेत. आता मला सांगा, ५ वर्षापूर्वी त्या बसमधल्या प्रवास्यांचे नाव आणि पत्ते CBI ला इतक्या वर्षांनंतर कुठून मिळाले?
  4. मानवी हक्क– खोट्या चकमकीत तस्करांना मारण्यात मानवी हक्क कसे आड येतात? उलट असे तस्कर जिवंत राहिले तर नागरिकांचे जीव (आणि मानवी हक्क) धोक्यात येतात. पंजाब आणि मुंबईमधील गुन्हेगारी आटोक्यात आणतांना कित्येक गुन्हेगारांना पोलीसांनी असंच संपवलं होतं.
  5. CBI चे काम – शीखविरोधी दंगल, बोफोर्स आणि युनिअन कारबाईड प्रकरणात कोंग्रेसचे बडे बडे नेते अडकले आहेत. तेलगी, पुण्याचा हसन अली, स्वीस बँकेतील काळा पैसा असे महत्वाचे गुन्हे सोडून CBI एका तस्कराच्या खुनाचा तपास का करते आहे?.

मुंबई हल्ल्याच्यावेळी पोलिसांनी कसाबच्या ९ साथीदारांना मारण्यात यश मिळवलं होतं. मग आता ‘आर आर आबांना’ CBI अटक करणार का? शस्त्रांची तस्करी करण्याऱ्या गुन्हेगाराला मारल्यामुळे जर गृहमंत्र्यांना अटक होणार असेल तर पोलिस ह्यापुढे गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्नाच करतील का? एकूण काय की ‘चोर सोडून संन्यास्याला फाशी’ असा प्रकार आहे.

Advertisements