काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Posts tagged ‘मकबूल’

‘मजबूर’ फिदा हुसेन

मकबूल फिदा हुसेनला कतार देशाने नागरिकत्व दिल्याची बातमी परवा वाचनात आली. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढल्याने काही संघटनांनी त्याविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. हुसेनवर १२०० फौजदारी खटले दाखल झाले होते आणि म्हणून तो भारत सोडून दुबईला पळाला होता. अजूनही सर्वोच्य न्यायालयात त्याच्या विरुद्ध ३ खटले प्रलंबित आहेत. भारतीय नागरिकत्व सोडल्याने आता भारतीय न्यायालयात त्यावर खटले चालवता येणार नाहीत.

आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय वृत्तपत्रांनी ह्यावर वेगळाच सूर आवळला आहे. परवाच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये तस्लिमा नसरीनवरील अग्रलेखात संपादक महाराज म्हणतात: “हुसेन यांचे ‘भारतमाते’चे चित्र हे धर्मश्रद्धा दुखावणारे असून, त्यासाठी त्यांच्यावर खटला भरावा, ही मागणी आधी दिल्ली हायकोर्टाने आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. अशा स्थितीत वयाच्या ९५व्या वर्षी त्यांना मायदेशाशी असलेली नाळ तोडण्यास मूठभरांच्या झुंडशाहीमुळे भाग पडावे, हे देशाला लाजिरवाणे आहे.”

मी संपादकांना पुढील काही गोष्टींचा खुलासा करण्याची विनंती केली पण अजून तरी काही उत्तर आलेले नाही!

१. भारत मातेच्या आणि देवतांच्या नग्न चित्राने भावना दुखावणे स्वाभाविक नाही काय?

२. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर हुसेनने इतर धर्मीय देवतांची नग्न चित्रं का काढली नाहीत?

3. मायभूमीचे नग्न चित्रं काढणाऱ्याची मायभूमीशी ‘नाळ’ तुटली म्हणून देशाला का लाज वाटावी?

ह्याच अग्रलेखात संपादक हुसेनची तस्लिमा नसरीनशी तुलना करतात: “तस्लिमा नसरीन यांना ‘कट्टरपंथी मुस्लिम मानसिकते’मुळे त्यांच्या मातृभूमीतून परागंदा व्हावे लागले, याविषयी हळहळ व्यक्त करण्यात देशातील तथाकथित हिंदुत्ववादी प्रवाह आघाडीवर असतो. परंतु तोच जागतिक कीतीर्चे चित्रकार एम. एफ. हुसेन यांना देशातून परागंदा व्हायला भाग पाडतो, हा विरोधाभास आहे.”

ही तुलना म्हणजे अडाणीपणाचा कळस आहे. तस्लिमाने जुन्या रुढी परम्पारांविरुद्ध बंड पुकारले (बुरखा, तलाक) पण पैगंबर वा इतर श्रद्धेय लोकांवर चिखलफेक केली नव्हती. आणि म्हणून कट्टरपंथीयांनी तिला केलेला विरोध असमर्थनीय आहे. भारतात ज्यांनी अशी सुधारणावादी चळवळ उभारली (उदा. सतीप्रथेचा विरोध, स्त्री-शिक्षण) त्यांना तत्कालीन समाजाचा विरोध झाला. पण लवकरच समाजाने नवे विचार स्वीकारून त्यांना सहकार्य दिले. कोणीही कर्वे वा राजा राममोहन रॉय ह्यांना झालेल्या विरोधाचे समर्थन केलेले नाही. पण नग्न चित्रे काढण्यामागे हुसेनचा कुठला सुधारणावादी दृष्टीकोण होता?

अग्रलेख वाचून वाटलं की संपादकांनी बुद्धी गहाण ठेवली की काय. पण मग लक्षात आलं की त्यांनी नितीमात्तच विकली आहे. वर्ल्ड ख्रिश्चन कौन्सिल ८०% भागधारक असणाऱ्या वृत्तपत्र समूहात आपली मतं मांडण्याचा हक्क भारतीय संपादकांना आहे का? आणि असल्यास त्याचा वापर करण्याची धमक संपादकांमध्ये आहे का? स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी शेवटी तेही ‘मजबूर’ आहेत.

Advertisements