काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

Archive for the ‘Uncategorized’ Category

नेमाडे – एक असंस्कृत अडगळ

वाक्चौर्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ हि कादंबरी अपेक्षेपेक्षा फारच कमी खपली.  ‘हिंदू’ च्या एकूण चार कादंबऱ्याची मालिका निघणार होती. पण ह्या अपयशामुळे नेमाडेंचे पुढचे तीन भाग abort झालेत. त्यामुळे हे अपयश भरून काढायला पॉपुलर ने ‘कोसला’ ची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

 कोसला म्हणजे ‘अभिजात वाण्ग्मयीन चौर्यकर्म ‘ चा  उत्तम नमुना आहे. इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून भारतीय  नावे  देवून  नेमाडेंनी पंचवीस  वर्षे मानधन खाल्ले. आता ३५० रुपयात नेमाडेंच्या ‘दुर्मीळ’ फोटोसकट नवीन आवृत्ती आली आहे (रविवर म टा ).

नेमाडे म्हणजे काय सत्य साई बाबा आहेत की शंकर महाराज ? पुस्तकाबरोबर नेमाडेंचा फोटो घेवून आम्ही  काय करायचं ?
मराठी प्रकाशकांची पातळी अशीच खालावत राहिली तर एक दीवस मराठी पुस्तकं  घ्यायची लाज वाटेल.Shame on you Popular Prakashan!

Advertisements

हिंजवडीमधील वाहतूक व्यवस्था

गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. आमच्या सारखे हजारो लोक जे रोज हिंजवडी भागात जातात त्यांना माहित आहे की   की .मी . अंतर कापायला ३० मिनिटांहून जास्त वेळ लागतो. रस्ता सुधारणे शक्य असून वर्षोनुवर्ष खराब रस्ते तसेच पडून आहेत. १५  वर्षांमध्ये MIDC ला येथे बस आगर बांधायला जमलेले नाही . हे सर्व केवळ स्थानिक राजकीय नेत्यांच्या  दबावामुळे सुरु आहे. आणि मुख्य म्हणजे आपण हे मुकाट्याने सहन करत आलोय.

आता येवू घातलेल्या निवडणुकांमुळे आपल्याला परिस्थितीत सुधारणा करण्याची सांडी चालून आली आहे. प्रथम स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसला विनंती करून आणि रस्ते न सुधारल्यास निवडणुकीत बहिष्काराची चेतावणी देवून आपण हिंजवडीमधील वाहतूक व्यवस्था सुधारू शकतो.

रस्ते रुंदीकरणाची विनंती करण्यासाठी आपण केवळ एक email (info@ncp.org.in) तर पाठवू शकता ना ? ह्या एका छोट्या प्रयत्नाने जर आपले रोज ३०  मिनिटं वाचणार असतील तर मग उशीर कशाला? आजच email पाठवा आणि अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/HinjewadiTraffic  ह्या संकेत स्थळावर भेट द्या .

धडा

 

फोडले कोणी थोबाड तरी शिकू नका धडा
मगरपट्टा आणि लवासात तुम्ही आपले खात रहा

Tag

TAG—–

1.Where is your cell phone?
वाजला  की कळेल आपोआप

2.Your hair?
अजून तरी आहेत  

3.Your mother?
प्रेम स्वरूप  आई..

4.Your father?
बाप  माणूस

5.Your favorite food?
तांदुळाची  भाकरी, पापलेट रवा fry

6.Your dream last night?
इतक्या सुखानी कोण झोपू देतो मला!

7.Your favorite drink?
प्यायला- शहाळं  ,  बघायला – टकीला  ऑन  फायर

8.Your dream/goal?
एक  सुखी आयुष्य

9.What room are you in?
लिविंग

 10.Your hobby?
वाचन आणि नाट्य संगीत

11.Your fear?
ट्राफिक  जाम

12.Where do you want to be in 6 years?
असाच  सगळ्यानबरोबर

13.Where were you last night?
घरीच, दुसरा काही  पर्याय नव्हता

 14.Something that you aren’t?
चमचा

 15.Muffins?
पेरूची  जेली

16.Wish list item?
अंतराळ फेर  फटका

17.Where did you grow up?
still growing

18.Last thing you did?
दीर्घ  स्वास

19.What are you wearing?
टू पीस (म्हणजे शर्ट ट्राउझर)

20.Your TV?
मुलाला ब्याट  आपटायची  गोष्ट  

21.Your pets?
चिऊ  काऊ

 22.Friends?
जणू माणिक मोती- फार  थोडे पण एकदम खास   

23.Your life?
माझे  जीवन गाणे …

24.Your mood?
दि:ग्मूढ

 25.Missing someone?
शाळेतले दिवस

26.Vehicle?
यामाहा

 27.Something you’re not wearing?
अंगठी  (सारखी हरवायची भीती)

28.Your favorite store?
चहाची टपरी

29 Your favorite color?
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

30 When was the last time you laughed?
ऑफिस मध्ये भरपूर लोक आहेत हसण्या सारखे , त्यामुळे रोज हसता येतं

31.Last time you cried?
ती  गेली  तेव्हा.. (गावाला)

32 Your best friend?
मी  माझा

33 One place that you go to over and over?
ऑफिस

 34 One person who emails me regularly?
online lottery  वाले

35. Favorite place to eat?
जगाच्या पाठीवर कुठेही