काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

पैसे कमावण्यापेक्षा पैसे योग्यरित्या गुंतविणे कठीण आहे ह्यात वाद नाही. पण ह्या कठीण कामात आपल्याला मदत (?) करणारे ‘आर्थिक सल्लागार’ हे काम आपल्यासाठी अधिक अवघड करून ठेवतात.

ही सल्लागार मंडळी कंपनीचे दलाल (मराठीत- एजंट) असतात. त्यांना अर्थव्यवस्थेची आणि भांडवलीबाजाराची केवळ वरवर माहिती असते पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असल्याने आपण त्यांना प्रमाण मानतो. आणि जिथे जास्त दलाली (सभ्य भाषेत- कमीशन) मिळेल तो गुंतवणुकीचा पर्याय ते आपल्याला विकतात. ह्याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे ULIP आणि जीवन विमा.

ULIP च्या नावावर विमा कंपन्यांनी मागील ७-८ वर्षात जो घोळ घातला त्याची कबुली स्वतः विमा कंपन्या agressive selling, misselling अश्या गोंडस शब्दांनी देतात. ULIP हे म्युचल फंड प्रमाणेच काम करतात फक्त ह्यात वार्षिक गुंतवणुकीच्या ५ पट जीवन विमा संरक्षण मिळते. पहिल्या वर्षी २५% ते ५०% प्रिमिअम अलॉंकेशन चार्जेस कापून (खावून) उर्वरित रक्कम गुंतवणूक म्हणून वापरणारी ही अजब स्कीम.

१० लाखाच्या विम्यासाठी ULIP मधे १ लाख ३० हजार इतके शुल्क पडते. LIC च्या टर्म प्लान मधे हेच शुल्क  केवळ ३० हजार पडते. आणि तरीही हजारो लोक (मी पण त्यातलाच) ह्यात फसले. आपण का फसलो आणि सरकारने जाणतेपणी आपली फसवणूक का होवू दिली हे थोडे मनोरंजक आहे:

आपण का फसलो?

ULIP   मधील गुंतवणूक कर सवलतीस पात्र होती. शिवाय ह्यात ३ वर्षांनी पैसे काढून परत गुंतवून त्यावर परत कर सवलत घेण्याची मुभा होती (withdraw-reinvest and claim tax benefit on reinvested amount!) त्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित झाले. एजंटला न भूतो न भविष्यति असं कमीशन होतं त्यामुळे त्यांनीही ULIP  हाच सर्वोत्तम पर्याय आहे असा प्रचार केला.

सरकारमान्य फसवणूक

विमा क्षेत्र खुले झाल्यावर अनेक खाजगी विमा कंपन्यांनी ह्यात प्रवेश केला. विमा हा दीर्घ मुदतीचा धंदा आहे आणि नफा कमवायला कित्येक वर्ष वाट पहावी लागली असती. पण देशभर ऑफिस आणि एजंटचे जाळे विणत असलेल्या कंपन्यांना आपला खर्च चालवत LIC शी टक्कर देणं केवळ अशक्य होतं. आणि म्हणून सरकारने भरगोस शुल्क असलेल्या ULIP  ला ‘दीर्घ मुदत गुंतवणूक’ असा दर्जा देवून कर सवलत दिली. आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी ३ वर्षानंतर पैसे काढण्याची पळवाट देखील तयार केली. उलट अशी स्कीम नसती तर खाजगी कंपन्या विमा क्षेत्रात येउच शकल्या नसत्या.

मधे SEBI ने ULIP  विरोधात रान उठवला होतं त्यामुळे आता ULIP  शुल्क बरेच कमी झाले आहे पण १० वर्षापर्यंत एक्झिट लोड आहे.  थोडक्यात ULIP  हा jack of both but master of none आहे. म्हणून ULIP  घेण्यापेक्षा जीवन विमा घेवून उर्वरित रक्कम म्युचल फंडमध्ये गुंतवणे अधिक चांगले.

 

Advertisements

Comments on: "सट्ट्याचे प्रयोग- २ (अजब ULIP की गजब कहानी)" (5)

  1. पूर्णतः सहमत !!

  2. १००% सहमत…च्यायला माझी पण लागली होती… दोन महिन्यापुर्वीच नुकसान सोसुन गुपचुप पैसे काढुन घेतले अन गप्प बसलोय.

  3. ULIP chi tulna Term Insurance barobar kashi karu shakta tumhi

    • ULIP is primarily Insurance Plan and the purpose is to insure life. It’s market linkage is just a feature. So it is combination of Insurance and mutual fund.
      So ideally, one should go for Term Insurance for Insurance need and Mutual Fund for investment need.

  4. aabhari ahe!!!!!!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: