काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

पुण्य नगरी पुणे येथे नुकताच बालकमंदीर प्रवेशाचा हंगाम (pre school admission season) सुरु झाला. विशेषतः कोथरूडमधे लोकसंखेच्या तुलनेत शाळा कमी असल्याने चांगल्या शाळांचा अर्ज घेण्यासाठी पालकांना तासंतास रांगा लावाव्या लागतात.

सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे कोथरूड सारख्या मराठमोळ्या भागात सगळ्या चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह करतात म्हणून मराठी शाळा नाहीत की मराठी शाळा नाहीत म्हणून पालक नाईलाजाने इंग्रजी शाळांकडे जातात?

नळ स्टॉपला ‘अभिनव’ ही ४-५ की.मी. दूर असलेली कोथरूडच्या ‘सगळ्यात जवळची’ चांगली मराठी शाळा. बाकी न्यु इंडिया, मेलेनिम, परांजपे, सेवा सदन, सरस्वती, स्प्रिंग डेल अश्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. वासुदेव बळवंत फडकेंचा वारसा सांगणारी ‘बाल शिक्षण’ शाळा देखील ‘प्युर इंग्लिश’ आहे. ह्या शाळांना मराठी माध्यम नसल्याची जरासुद्धा खंत नाही उलट आपल्या इंग्रजी माध्यमाचा गर्व आहे.

‘सेमी इंग्लिश’ हा एक चांगला व्यवहार्य पर्याय असुनदेखील पेठांबाहेरील बहुतेक शाळांमध्ये ह्याची सोय नाही (अपवाद अभिनव विद्यालय). पालक सुद्धा विनाकारण इंग्रजीचा आग्रह धरतात. ‘अभिनव इंग्लिश’साठी रांगा लावणाऱ्या बहुतांश मराठी पालकांनी ‘अभिनव मराठी’चे माहिती पत्रक देखील घेतले नाही. मराठी माध्यमातून शिकणे त्यांना बहुतेक कमीपणाचे वाटते.

आज इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, पण म्हणून मराठीचा बळी देण्याची गरज नाही असं वाटतं.

Advertisements

Comments on: "मराठमोळ्या कोथरूडमधे सगळ्या इंग्रजी शाळा!" (5)

 1. gitanjali shahane said:

  Marathi lokanich khari suruvat keli english mediam shala vadvnychi

 2. gitanjali shahane said:

  marathi bhsha vachvaychi asel tar suruvat gharatun karavi lagel

  • तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता मुलांना मराठीतून शिकवायची सोय राहिली नाही.
   बिहारींविरूद्ध आंदोलन करणे सोपे आहे, मराठी शाळा चालवणे कठीण आहे. त्यामुळे मराठी अस्मिता आता फक्त भाषणातल्या ‘जय महाराष्ट्र’ पुरतीच उरली आहे.

 3. श्रीराम भुसारी said:

  न्यु इंडिया आणि बाल शिक्षण या शाळांच्या संस्था चालकांतर्फ़े मराठी माध्यमातील शाळा चालविल्या जातात आणि त्यासुध्दा हाऊसफ़ुल्ल असतात. पण एकंदरीत मुलांच्या संख्येच्या मानाने नगण्य आहेत.

 4. नमस्कार श्रीराम.
  एकेकाळी ह्या संस्थांच्या मराठी शाळा चांगल्या होत्या, पण आता शिवराय प्रतिष्ठानची शाळा फार काही चांगली नाही. आणि MES ची मराठी शाळा पेठांमध्ये आहे (प्रभात रोडची मराठी शाळा आता बंद झाली). कोथरूडच्या सर्वोत्कृष्ट १० शाळांमध्ये एकाही मराठी शाळा नसावी ह्याचे वाईट वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: