काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

नेहरूंना मुलं आवडायची म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बाल दिवस साजरा करतात.  त्यांना लेडी माउंटबॅटन पण आवडायची, मग ह्या दिवशी प्रेम दिवस का साजरा करू नये?

बाई बाईत (माणसा-माणसात म्हणतो ना तसचं) भेदभाव न करता आंतराष्ट्रीय स्तरावर प्रेमाचा संदेश देण्याचा हा दिवस.

पामेला हिक्स (माउंटबॅटन ह्यांची कन्या) हिने आपल्या पुस्तकात नेहरू आणि तिच्या आईच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. नेहरू आणि एडविना माउंटबॅटन ह्यांना फार एकटं-एकटं वाटत होतं आणि त्यातून दोघं जवळ आले असं तिनी नमूद केलं आहे.

Reference:  India Remembered

Writers – Pamela Mountbatten-Hicks, India Hicks

Publisher- Pavilion, 2009

 

मुलं हे उद्याचे मतदार आहेत आणि त्यांना नेहरू-गांधी नावाचा विसर पडू नये म्हणून बहुतेक बालदिनाचे खुळ सुरु झाले. शाळेत असतांना ‘चाचांना गुलाब फार आवडे’, ‘चाचांना लहान मुले फार आवडत’ असे त्यांचे निरर्थक वर्णन करून ह्या दिवशी मिठाई वाटली जाई. मोठे झाल्यावर कित्येक लोकांना नेहरूंची तीच प्रतिमा लक्षात राहते आणि मग आपोआप ‘पंजावर शिक्का’ मारल्या जातो.

बाकी, ह्या नेहरू परिवाराने सर्वधर्मीय परिवाराचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. हा त्यांचा वंशवृक्ष (वंशवेल म्हणा हवं तर)

Advertisements

Comments on: "१४ नोहेंबर – प्रेम दिवस" (5)

 1. कमला नेहरू ह्यांची प्रकृती सारखी बिघडलेली असायची, त्यामुळे वैवाहिक जीवनातलं सुख त्यांना कधी मिळालंच नाही. त्यामुळे मानवी स्वभावानुसार त्यांचं इतरत्र आकर्षित होणं स्वाभाविक होतं.

  • राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी तरी आपलं व्यक्तिगत चारित्र्य जपायला हवं. आता, एन. डी. तिवारी ह्यांनी ८२ व्या वर्षी हीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, मग त्यांना राज्यपाल पदावरून का काढलं?

 2. प्रणवराव : तुम्ही चांगले लिहू शकाल; पण तुमच्या नीतिमत्तेच्या बालिश कल्पना, आंधळा कॉग्रेसद्‌वेष, स्वत:ला हवी तीच गोष्ट पाहणे यामुळे तुमचे लेख भंपक बनत चालले आहेत. नेहरूंचा तो वंशवृक्ष हा काही खरा नाही. असला अपप्रचार तुम्हाला वापरावासा वाटला, यातच तुम्ही उघडे पडलात. आणि फक्त हिन्दु रक्त घराण्यात असलेला प्रमोद महाज़न परिवार चारित्र्यसंपन्नतेचे काय दिवे लावतो आहे, हे दिसतंच आहे.

  नेहरूंचा जन्मदिवस प्रेमदिवस साज़रा करावासा वाटत असेल, तर शिवाजीचा जन्म किंवा कृष्णाचा जन्म एकपत्नी-कायदा-निषेधदिन म्हणून का पाळू नये? संभाजी, नेताजी पालकर मुसलमानांच्या गोटात गेले या प्रसंगांची चित्रं त्यांच्यावरच्या पुस्तकांत लावाल का? बोरकर, पु ल, कुसुमाग्रज यांची सिगरेट हातात असलेली छायाचित्रे चालतील का? मग नेहरूंचाच असा फोटो देण्यात काय औचित्य आहे? ‘(पहिला) बाजीराव घोड्यावर झोपत असे’, या खर्‍याखोट्या वाक्याबरोबर ‘आणि त्यानी एक मुसलमान बाई रखेल ठेवली होती’ हे सत्य मुलांना इतिहासाच्या पुस्तकांत का सांगू नये? ग्लॅडस्टनचं प्रसिद्‌ध विधान आहे की त्यानी ११ प्रधानमंत्री पाहिले, त्यापैकी ८ ज़णांची विवाहबाह्‌य प्रकरणं होती. तरी त्या काळात त्यांनी साम्राज्य चालवलं. नेहरूंनी भानगड केली तसा जॉर्ज फर्नांडिसही उघडपणे जया जेटलीबरोबर राहिला. पण मंत्री म्हणून कारभार चोख केला. काश्मिरात सैनिकांना अनेकदा भेट देणारा तो पहिला मंत्री.

  > ह्या दिवशी मिठाई वाटली जाई. मोठे झाल्यावर कित्येक लोकांना नेहरूंची तीच प्रतिमा लक्षात राहते आणि मग आपोआप ‘पंजावर शिक्का’ मारल्या जातो.
  >—–

  निवडणूक तुम्हांला वाटते तितकी सरळ प्रक्रिया नाही. लोक कधी-का-कसे मत देतात याचा अंदाज़ भल्याभल्यांना आलेला नाही.

  – डी एन

 3. नमस्कार डी.एन.

  नेहरू नीतीमत्ता आणि चोख कारभार ह्या दोन्ही बाबतीत अपयशी ठरले. बाजीरावाने मुसलमान बाई ठेवली पण तिला राजकारणात ढवळाढवळ करू दिली नाही. जया जेटलीमुळे जॉर्ज फर्नांडिसने आपल्या कामगार लढ्यात खोट केली नाही. पण एडविनाने नेहरूंचे कित्येक महत्वाचे निर्णय इन्फ्लूएन्स केले होते (विशेषतः फाळणीच्या वेळला) . नेहरू ‘बिझी’ असल्याने त्यांचे पूर्वोत्तर राज्यांकडे दुर्लक्ष झाले आणि आता ती राज्ये आपल्यापासून तुटण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून ‘नेहरू’ द्वेष.
  आणि बोरकर, पु.लं. ही काही राष्ट्रीय व्यक्तिमत्वे नव्हेत. त्यांनी सिगारेट ओढणे आणि देशाच्या पहिल्या पंतप्रधानाने व्होईसरॉयच्या बायकोबरोबर सिगारेट ओढणे ह्यात फरक आहे, ही नितीमत्तेची बालिश कल्पना नव्हे.
  मतदानाबाबत तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण गांधी-नेहरू नाव लोकांसमोर कायमस्वरूपी ठेवण्याचा अट्टाहास अगदी सहज समजण्यासारखा आहे. कितीतरी अशिक्षित लोकांना आताचे गांधी हे महात्मा गांधींचे वंशज वाटतात. भारतात कित्येक महत्वाचे सार्वजनिक ठीकाणं, विमानतळ, शासकीय योजना ह्या नेहरू-इंदिरा-राजीव ह्यांच्या नावावर आहेत जणूकाही गांधी हा भारताचा राजवंश आहे.

 4. Why is Pu La not a figure of public influence, who might influence morals? Because he is in your good books and Nehru is not? Many public figures used to smoke openly. Nehru very likely was smoking in a private setting, and he is entitled to that luxury. Churchill’s love for cigar (and alcohol) was well-known. It didn’t stop him from being a great leader.

  Nehru and Gandhi had their beliefs. Is there any data to show that Nehru behaved differently after Edwina went back to UK? It is mere figment of imagination of Nehru haters that Edwina influenced any decision-making. During the time Nehru and Edwina were close to each other, Gandhiji was the most important political figure. He was Nehru’s leader and Nehru followed that philosophy, whether you like it or not. Nehru’s opponents from Hindutva brigade have hardly given us leaders free of romantic intrigue. Among BJP’s chief ministers, Uma Bharati made it to gossip columns, Kalyan Singh’s downfall was partly related to his proximity to Kusum Rai, and Yediyurappa’s wife committed suicide, allegedly because her husband wasn’t 100% loyal. Gopinath Munde has made news in the past. Savarkar-bhakta politician Vidyadhar Gokhale had two wives. Political leaders tend to have a risk-hungry side. Who cares? On the whole, a public figure is expected to follow a standard of propriety and there wasn’t anything serious to find fault with in Nehru’s private conduct.

  “पण गांधी-नेहरू नाव लोकांसमोर कायमस्वरूपी ठेवण्याचा अट्टाहास अगदी सहज समजण्यासारखा आहे.” –> Every political party tries to milk any advantage which comes its way. Your point that everything in India is named after Nehrus and Gandhis (and Ambedkar and Shivaji) is valid. That is not desirable. But for the birthday of the first prime minister to be called Children’s Day, what’s wrong with it? It is silly to object to it.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: