काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

परवा एका मासिकात ‘जागो ग्राहक जागो’ची जाहिरात बघून मी दिवाळीत केलेली खरेदी तपासून बघितली. आणि मग धक्के बसायला सुरवात झाली. कित्येक गोष्टींमध्ये मी चक्क फसवल्या गेलो आहे असं लक्षात आलं.  उदा:

ट्रॉपिकॅना – मी जे फ्रूट जूस म्हणून आणलं ते कृत्रिम जूस निघालं. बेवरेज/नेक्टर म्हणजे थोड्या पल्पमध्ये कृत्रिम रंग, गंध आणि साखर टाकून फळाच्या रसासारखं पेय तयार करतात. कंपनीच्या हेल्पलाईनला विचारल्यावर ते म्हणाले की पॅकवर ‘बेवरेज’ लिहिलं आहे, जूस असं लिहिलेलं नाही! मग मला कळलं की ‘बेवरेज म्हणजे जूस नसतं, आणि असं सगळ्या कंपनींच सेम असतं’

निहार अलमेंड ऑइल – विद्या बालनची जाहिरात आहे “goodness of five almonds”. ती हे तेल लावते म्हणून मी पण हेच विकत आणलं 😉 पण घरी येऊन कन्टेन्ट वाचतो तर काय आश्चर्य. ह्यामध्ये ९०% वनस्पती तेल आणि ९% इतर तेल आहे. ह्या ९% चा केवळ काही भाग बदाम तेल आहे. म्हणजे ५% पेक्षा कमी बदाम तेल असूनही हे बदाम तेल.  बाईमुळे चुकीची बाटली घेतल्या गेली आणखी काय?

कपडे- एका मॉलमधून शर्ट खरेदी केला. ८०० रुपयाचा शर्ट धुण्यासाठी ८ सूचना शर्टच्या स्टीकरवर लिहिलेल्या होत्या: गरम पाण्यात धुवू नका, उन्हात वाळवू नका, पहिल्या धुण्याआधी ड्रायक्लीन करा, उलट बाजूने इस्त्री करा… लहानपणी १००-२०० रुपयाचा शर्ट असायचा आणि आमची बाई तो दगडावर आपटून आपटून धुवायची. पण तरीही कपडे वर्षानुवर्ष टिकायचे. आता महागाचे ब्रांडेड कपडे धुवायला एवढे नाटकं आणि तरीही १ वर्षात त्यांचा रंग फेड होतो.

ब्रांडेड गोष्टींसाठी जादा पैसे देऊनही गुणवत्तेची खात्री नाही कारण ग्राहक (म्हणजे आपणच) अजूनही जागरूक नाही.

स्वतः फसवल्या गेल्यामुळे की काय पण माझं consumer awareness बद्दल कुतूहल जागृत झालं आहे. आपले काही अनुभव/ उपयुक्त माहिती असल्यास जरूर लिहावे.

 

Advertisements

Comments on: "दिवाळी खरेदी आणि ‘जागो ग्राहक जागो’" (3)

 1. fasvnuk satat hotch aste mobail madhil balans kuthalyatari
  skim khali kami hoto apan konatihi skim ghetleli naste-
  gold frem chasma ghetala 4divsat pandhra zala-
  tata water filtar ghetala 1mahinyatch bighadla-
  copar botam pateli ghetali 15divsat copar gul-
  12rupayache pani batli Rs.15-dudh 12.50 Ru,milate 14Ru.la
  kiti ani kothe takrar karaychi.

  • दत्तात्रय, असे अनुभव मला आणि इतरांना देखील आले आहेत. पण जसजसे ग्राहक जागरूक होत आहेत, परिस्थिती बदलते आहे.
   उदा. ULIP मधे ४०% रक्कम entry load च्या नावाखाली कंपन्या हडप करायच्या. आता नवीन नियमानुसार २% पेक्षा जास्त रक्कम घेता येत नाही.
   ग्राहक न्यायालयांनी काही वर्षात चांगली भूमिका बजावली आहे. पण अजूनही लोकांमध्ये पुरेशी जागृती नसल्याने ह्या कंपन्यांचे फावते.
   आपण जेव्हा फसवले जातो तेव्हा त्या कंपनीला इमेल करून आपली बाजू मांडावी, आणि इतरांना सावध करावे. ग्राहक जागरूक आहेत पाहून असे प्रकार आपोआप कमी होतात.

 2. face book var coralhub.com ya kampanichi LED wrist watch chi jahirat hoti jar ghdyal have asel tar tycha pro.i d lihun 575752 var sms kraycha mag te curiar ne pathvtat paise deun
  curiar gyayche mala LED jara navin ghdyalacha prkar vatla ,mi sms kela 8oct,11curiarne watch ale 14th oct 11,pan parsal ughdle teva kach tutleli hoti mi 02242470800 C.C var phon karun sangitale ani lagech andheri yethil tyanchya offic madhye part kele tase lihun dile 7 divsat part dusare pathvto ase sangitale.curiar ghetale teva ghdyalachi prais rs,499+
  shiping che 80,rs ase 579 dile hote.ata 40 divas zale tari mala watch pathvale nahi,paise pan ghetale ghdyal pan tyanchya kade,asa mi murkh banlo,tyana 10-15 vela phon kela pan
  2,divsat pathvato ase dar vili sangtat,mail kela tar riplay det nahit,dusara koni asa banu naye mhanun lihit ahe,tasech mala koni mrgdrshan krave ki mala ghdyal part milel.
  ordar,no,8274.asa ahe.teva sarvana vinanti ki net var jahirat pahun kontihi vastu gheu naye fasvanuk hote.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: