काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

मकबूल फिदा हुसेनला कतार देशाने नागरिकत्व दिल्याची बातमी परवा वाचनात आली. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढल्याने काही संघटनांनी त्याविरुद्ध उग्र निदर्शने केली होती. हुसेनवर १२०० फौजदारी खटले दाखल झाले होते आणि म्हणून तो भारत सोडून दुबईला पळाला होता. अजूनही सर्वोच्य न्यायालयात त्याच्या विरुद्ध ३ खटले प्रलंबित आहेत. भारतीय नागरिकत्व सोडल्याने आता भारतीय न्यायालयात त्यावर खटले चालवता येणार नाहीत.

आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय वृत्तपत्रांनी ह्यावर वेगळाच सूर आवळला आहे. परवाच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये तस्लिमा नसरीनवरील अग्रलेखात संपादक महाराज म्हणतात: “हुसेन यांचे ‘भारतमाते’चे चित्र हे धर्मश्रद्धा दुखावणारे असून, त्यासाठी त्यांच्यावर खटला भरावा, ही मागणी आधी दिल्ली हायकोर्टाने आणि नंतर सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. अशा स्थितीत वयाच्या ९५व्या वर्षी त्यांना मायदेशाशी असलेली नाळ तोडण्यास मूठभरांच्या झुंडशाहीमुळे भाग पडावे, हे देशाला लाजिरवाणे आहे.”

मी संपादकांना पुढील काही गोष्टींचा खुलासा करण्याची विनंती केली पण अजून तरी काही उत्तर आलेले नाही!

१. भारत मातेच्या आणि देवतांच्या नग्न चित्राने भावना दुखावणे स्वाभाविक नाही काय?

२. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर हुसेनने इतर धर्मीय देवतांची नग्न चित्रं का काढली नाहीत?

3. मायभूमीचे नग्न चित्रं काढणाऱ्याची मायभूमीशी ‘नाळ’ तुटली म्हणून देशाला का लाज वाटावी?

ह्याच अग्रलेखात संपादक हुसेनची तस्लिमा नसरीनशी तुलना करतात: “तस्लिमा नसरीन यांना ‘कट्टरपंथी मुस्लिम मानसिकते’मुळे त्यांच्या मातृभूमीतून परागंदा व्हावे लागले, याविषयी हळहळ व्यक्त करण्यात देशातील तथाकथित हिंदुत्ववादी प्रवाह आघाडीवर असतो. परंतु तोच जागतिक कीतीर्चे चित्रकार एम. एफ. हुसेन यांना देशातून परागंदा व्हायला भाग पाडतो, हा विरोधाभास आहे.”

ही तुलना म्हणजे अडाणीपणाचा कळस आहे. तस्लिमाने जुन्या रुढी परम्पारांविरुद्ध बंड पुकारले (बुरखा, तलाक) पण पैगंबर वा इतर श्रद्धेय लोकांवर चिखलफेक केली नव्हती. आणि म्हणून कट्टरपंथीयांनी तिला केलेला विरोध असमर्थनीय आहे. भारतात ज्यांनी अशी सुधारणावादी चळवळ उभारली (उदा. सतीप्रथेचा विरोध, स्त्री-शिक्षण) त्यांना तत्कालीन समाजाचा विरोध झाला. पण लवकरच समाजाने नवे विचार स्वीकारून त्यांना सहकार्य दिले. कोणीही कर्वे वा राजा राममोहन रॉय ह्यांना झालेल्या विरोधाचे समर्थन केलेले नाही. पण नग्न चित्रे काढण्यामागे हुसेनचा कुठला सुधारणावादी दृष्टीकोण होता?

अग्रलेख वाचून वाटलं की संपादकांनी बुद्धी गहाण ठेवली की काय. पण मग लक्षात आलं की त्यांनी नितीमात्तच विकली आहे. वर्ल्ड ख्रिश्चन कौन्सिल ८०% भागधारक असणाऱ्या वृत्तपत्र समूहात आपली मतं मांडण्याचा हक्क भारतीय संपादकांना आहे का? आणि असल्यास त्याचा वापर करण्याची धमक संपादकांमध्ये आहे का? स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी शेवटी तेही ‘मजबूर’ आहेत.

Advertisements

Comments on: "‘मजबूर’ फिदा हुसेन" (7)

 1. Anonymous said:

  हुसेन चा जन्म गाव माहिती आहे का? पंढरपूर! विठ्ठला अजब तुझे सरकार.
  शशी थरूर हुसेन ला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करतो आहे आणि केरळ सरकार त्याला ‘रवि वर्मा’ पुरस्कार द्यायला निघाले होते? आपण निदान एवढेच करा की जिथे तुम्हाला हुसेनचे चित्रं दिसतील (हॉटेल वैगरे) तिथे व्यवस्थापकांसमोर तुम्ही आपली नाराजी व्यक्त करा.

 2. Atishay achuk lihilay tumhi. Ha agralekh vachun mihi petlo hoto aani lihinar hoto, pan majha gharcha pc band padla. Aaj tumcha lekh vachun man shant jhala. Me evadha muddesud lihu shaklo nasato. Dhanyawaad!

 3. I have done as Anonymous said. I was in Delhi & they were showing in Morden art musium only about MF Hussain.
  I have written in remark book & then director came asked me why so many comments? As I said U know only one artist in name of morden art.

 4. परवाच बातमी वाचली की शाळेच्या पाठ्यपुस्तकात येशू ख्रिस्ताचे आक्षेपार्ह (!) चित्र छापल्याने संबंधितांवर कारवाई. ही भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांतील घटना आहे. महम्मद पैगंबराचे असले चित्र जर हुसेन यांनी काढले असते तर आज ते जिवंत उरले नसते ही वस्तुस्थिती आहे. करूनच्या करून त्यांनी आता परत नक्राश्रू गाळणे व माध्यमांनी त्यांची भलावण करणे….सर्वच हास्यास्पद!

  अरुंधती

  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

 5. अतिशय अचूक आणि अप्रतिम. इतका भयंकर अग्रलेख यापूर्वी कधीही मटाच काय कुठल्याही वृत्तपत्रात आला नसेल. तुमच्या एकूण एका मुद्द्याशी सहमत.

 6. छान ,मुद्देसूद, आणि खणखणीत प्रत्युतर देणारा लेख .

 7. टाईम्स असो वा लोकसत्ता, हे सगळे नेहमीच मुसलमानांची बाजू घेत आले आहेत. तुमचा लेख उत्तम आणि मुद्देसूद आहे. तरी तुम्ही IBN-लोकमत वरचं चर्चा सत्र पाहिला नाहीत. त्यात तर निखील वागळे सरळ-सरळ असं म्हणत होता की फक्त विकृत मानसिकतेच्या हिंदूंची भावना हुसैनच्या चित्रांनी दुखावली असेल. विचारवंत हिंदूंना त्यात आक्षेपार्ह असं काहीच वाटलं नाही. वागळेच्या बायकोचं किव्हा आईचं नग्न चित्र काढायला हुसैन कडे कंत्राट दिलं पाहिजे. मग बघू त्याच्या भावना दुखावतात की नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: