काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

नुकतंच पुलंचे मैत्र हे पुस्तक वाचलं आणि भ्रमनिरास झाला. पंडित विष्णू दिगंबर ह्यांच्यावरील लेखात अनेक ठिकाणी पुलं गांधर्व महाविद्यालयासंदर्भात नाराजी व्यक्त करतात.  पूर्ण लेख वाचून झाल्यावर प्रश्न पडतो की इतका नकारात्मक लेख पुलंनी का लिहिला असेल. मला खटकलेले काही ठळक संदर्भ:

“पंडित विष्णू दिगंबरांनि संगीतात धर्म आणला”- संगीत शिक्षणाला प्रतिष्ठा मिळवून देणे हे त्यांचे जीवित कार्य होते. गायक, उस्ताद म्हणजे व्यसने असलेला अशी त्या काळी समजूत होती, सभ्य लोक संगीताकडे पाठ फिरवत.. अश्या वेळी संगीतातले पावित्र्य लोकांना दाखवून संगीत शिक्षणाला अनुकूल वातावरण तयार करण्याचे अवघड काम पंडितजी करू शकले ते केवळ धार्मिक अधिष्ठानाच्या जोरावर लोकांना आकृष्ट करून. पुलंचं साहित्य वाचून कितीतरी चांगले लेखक निर्माण झाले असतील, पण पुलंना ‘तुम्ही किती साहित्यिक निर्माण केले’ हे विचारणं कितपत शाहाणपणाचं ठरलं असतं?

“गांधर्व महाविद्यालय महान गायक तयार करू शकले नाही”– संगीत लोकांपर्यन्त पोचवणे हे पंडितजींचे धेय्य होते, गायक निर्माण करणे नव्हे. एकदा समाजात संगीताला पोषक वातावरण निर्माण झाले की चांगले गायक आपोआप समोर येतात, मग ते गांधर्व महाविद्यालयातून असोत अथवा सारेगमप  मधून असोत. पुलंचा मित्र परिवार मोठा होता. पण गांधर्व महाविद्यालयाशी त्यांची विशेष जवळीक नसावी (देवधरांसारखे काही अपवाद वगळता). आणि म्हणून गांधर्व महाविद्यालयाच्या केवळ उणीवा दाखवणे त्यांनी पसंत केले असावे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावोगाव शाखा काढून एकाच वैचारिक साच्यातील व्यक्ती निर्माण करण्याचा जो उद्योग केला तसलाच हा प्रकार होता”– संगीताचा इतका व्यापक प्रचार आणि प्रसार गुरू-शिश्य परंपरेतून होणे शक्य नव्हते, त्यासाठी संघटनात्मक व्यवस्थेची गरज होती. हे पुलंनी देखील लेखात एका ठिकाणी मान्य केलं आहे. मग ह्या वाक्याची काय गरज होती? पुलं हे समाजवादी. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी लोकांचे झालेले स्वप्नभंग (म्हणूनच साने गुरूजींनी आत्महत्या केली), समाजवादाचा झालेला ह्रास (पर्वतीच्या पायथ्याशी आता केवळ समाजवादी नेत्यांच्या नावाच्या झोपाडपट्ट्या उरल्यात) आणि संघाच्या ‘गोळ्वलकर’ गुरुजिंबद्दलचा मत्सर ह्या वैफल्यातून वरील टिप्पणी आली आहे.

गंमत म्हणजे ह्याच पुस्तकातील केसरबाई केरकर ह्यांच्या लेखामधे पुलंनी त्यांची तोंड भरून स्तुती केली आहे. आणि असे करत असतांना त्यांच्या उणीवा (लोकांकडे मेहेरबानी केल्यासारखे पहाणे, मैफीलीत रागाचे नाव न सांगणे) पूर्णत: दुर्लक्षित केल्या आहेत. आणि असं करण्याचं कारण म्हणजे पुलंचे केसरबाईशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध. 

एक प्रसिद्धा लेखक जेव्हा व्यक्तिचित्र लिहितो तेव्हा ते वैयक्तिक मानापमान आणि राग-लोभ बाजूला सारून लिहीणे अपेक्षित असते. दुर्दैवाने सदर लेखात पुलंची राजकीय मते अकारण उफाळुन आली आणि म्हणून म्हणावेसे वाटले: तुझे (मत) आहे तुजपाशी …परि तू जागा चुकलासी.

Advertisements

Comments on: "परि तू जागा चुकलासी" (8)

 1. Anonymous said:

  > एकदा समाजात संगीताला पोषक वातावरण निर्माण झाले की चांगले गायक आपोआप समोर येतात
  >—-

  सुशिक्षित लोकांचे लक्ष संगीतकलेकडे वळल्यास आणि कलेला समाज़ात प्रतिष्ठा मिळाल्यास १) गाण्यात रस असणार्‍यांची संख्या वाढेल, आणि २) त्यायोगे थोर कलाकारही निर्माण होतील, अशा दोन अपेक्षा होत्या. पैकी पहिली पूर्ण झाली, दुसरी झाली नाही. आणि आधी अशिक्षित लोकांतूनही मोठे गवयी होत, ते ही आता होत नाहीत. असे का, याचा विचार अनेकांनी केला आहे. विसाव्या शतकातल्या उत्तरार्धाचा (यात गांधर्व महाविद्‌यालयही आले) हा एक पराभव आहे. पु ल देशपाण्डे यांनी त्याचा उल्लेख केला, तो चूक नाही.

  पु लं ना रा स्व संघाविषयी आपुलकी नव्हती, हे सत्य आहे. पण संघाच्या शाखांतून ‘एकाच साच्यातले’ (खरे म्हणजे ‘बावळट’) खूप लोक तयार झाले, हे पण सत्य आहेच. मला त्यात एक संघवाला म्हणून फार कमीपणा वाटत नाही. संख्येत बळ असते. संघावरली टीका बरोबर आहे. संघवाले त्या टीकेकडे दुर्लक्ष करतात, ते ही बरोबर आहे.

  > केसरबाई केरकर ह्यांच्या लेखामधे पुलंनी त्यांची तोंड भरून स्तुती केली आहे.
  >
  चमचेगिरी करण्यात पु ल तरबेज़ होते. एकदा विनोबा बायकांच्या सभेत ‘यथेच्छ हसा’ संदेश देता झाले. याचे समर्थन करता येणार नाही असे नाही. पण पु लं नी त्याची अगदी हर्षवायू झाल्यासारखी स्तुती केली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळेच त्यांनी गांधर्व महाविद्‌यालयावर त्याच्या ज़माखर्चाच्या दोन्ही बाज़ू मांडल्या, हे त्या लेखाचे एक पु लं च्या बाबत एक वेगळे स्थान आहे. टीका करणे, हे त्यांचा स्वभाव नव्हता. ‘एखादे पुस्तक खराब का आहे, याबद्‌दल १० पाने लिहिण्यापेक्षा ‘हे पुस्तक वाचू नये’ सांगून प्रकरण निकालात काढावे’ असे तेच एकदा म्हणाले. स्वत:मधला स्वभावदोषही ते असा छान विनोद करून मांडत.

  > पुलंना ‘तुम्ही किती साहित्यिक निर्माण केले’ हे विचारणं कितपत शाहाणपणाचं ठरलं असतं?
  >—-

  ही तुलना चूक आहे. चांगला गायक तयार करता येतो; म्हणूनच पिढ्यानपिढ्या काही घराणी चाललेली आहेत. (उत्तम उदाहरण म्हणजे डागर कुटुंबातले कलाकार.) बापानी तालीम देऊन साहित्यिक घडवला, असा प्रकार होत नाही. लेखक जन्मावा लागतो.

  • आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. मी पुलंचा चाहता आहे आणि त्यांची बरीच पुस्तकं/कथाकथन मला आवडतात. पण मैत्र मधील तो लेख मला खटकला कारण तो एकांगी आहे. इतर कुठल्याही लेखात त्यांनी दोन्ही बाजूंनी विचार केलेला दिसत नाही. मग केवळ ह्याच लेखात का? म्हणून केवळ त्या लेखासंदर्भात मी माझी मतं लिहिली आहेत.
   बरे जे विष्णू दिगंबरांना लागू पडतं ते इतरांना पण लागू पडतं. पण केसरबाई, किंकारदा ह्यांच्या लेखात पुलंनी त्यांच्या योगदानाचा विचार केलेला नाही. आणि जे संघाला लागू पडतं ते समाजवाद्यांना सुद्धा लागू पडतं. पण एस एम आणि इतर समाजवाद्यांच्या लेखात पुलंनी त्यांच्या उद्योगांचे अवलोकन केलेले नाही.
   घराण्यांच म्हणाल तर त्याचं एकूण संगीत विश्वातलं स्थान हा वादाचा विषय आहे. घराण्यांनी संगीत बंदिस्त करून ठेवलं होतं जे लोकसंगीत आणि भाक्तीसंगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलं.
   एकूण काय तर हा लेख आवडला नाही. आपण प्रतिक्रियेत पुरविलेल्या माहितीसाठी पुन्हा एकदा आभार.

   • Naniwadekar said:

    > घराण्यांनी संगीत बंदिस्त करून ठेवलं होतं जे लोकसंगीत आणि भाक्तीसंगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलं.
    >—–

    Shri Pranav: It is quite silly to expect classical music to have the same reach as lighter forms of music, like lok-sangeet and bhakti-sangeet. While it is true that classical music saw rivaries between gharana-s and even between musicians of the same gharana, the reason why that music has always had limited reach is that it is not everybody’s cup of tea.

    There doesn’t really exist much correlation between a musical genre’s worth and the popularity it enjoys. To the extent that such correlation does exist, it almost always manifests itself in the form of better (as in deeper and more demanding) music being less popular. Third-rate singers like Anup Jalota or Jagjit Singh draw huge audience all over the world. But great singers like Basavraj Rajguru and K G Ginde are practically unknown even within India. A second-rate classical musician like Hariprasad Chaurasia is among the most popular artists, but a great singer like Gajananbuwa Joshi must surely have given many concerts where the audience was limited to double-digits.

    > पण मैत्र मधील तो लेख मला खटकला कारण तो एकांगी आहे. इतर कुठल्याही लेखात त्यांनी दोन्ही बाजूंनी विचार केलेला दिसत नाही. मग केवळ ह्याच लेखात का?
    >—-

    On the one hand, you accept that PL has considered both sides of the coin in this article. On the other hand, you call it one-sided? Please…. that is just inconsistent.

    I totally agree with you that his article on (say) Kesarbai is rather one-sided. I had read the article on Vishnu Digambar long ago but I do not remember it as being one-sided. That PL wrote 99 out of his 100 articles without being critical enough is no reason why he should follow the same (wrong) pattern in his 100th article. You may surely criticize him for writing several one-sided articles but if he broke that limiting pattern now and then in a few articles, it would be expected to, and it indeed does, add to the worth of the said articles where he is being a more strict evaluator.

    In the book ‘एक शून्य मी’, PL’s instincts and language are much more critical and much sharper than was the norm with him.
    .

    – dn

    .

   • Thank you for voicing your openion.

    Please refere my reply wrt the comment given by the reader.

    The person felt that the aticle was balanced. I feel it is not because it’s a VyaktiChitra not a analytical work.

    I dont expect Gharanas to have wider reach. But Panditji chose Bhakti Sangeet as he knew it will have wider reach and once people are attracted Sangeet shikshan will get respect (which worked). And he was right in his approach which Pu La criticized terming it communal.

    Lastly, it’s not easy to say who’s best and who is third class singer. If we say purpose of music is to enrich people’s lives, reach of music would definately matter. And there can be people who could not tolerate Kesarbai. But that does not mean she was third class singer. But Pu La happily announced that Gandhava Vidyalaya could not produce great singers. That was not the aim of Panditji. However, credit for many great singers will still go to Vidyalaya where they would have started their study.

    So my point was he chose to focus more on the negative (and only for this one article in that book).

   • नानिवडेकर said:

    प्रणव: पी एल नी विष्णु दिगंबरांवर लिहिलेला लेख वाचून बरेच दिवस झाले आहेत, त्यामुळे मी खूप तपशीलात चर्चा करू शकणार नाही. पण तो लेख मला आवडला होता, हे मला आठवतं आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या मोठ्या गायकांची कला पठडीतली, आणि सौंदर्यात कमी पडणारी, वाटते, असा पु लं चा रोख मला आठवतो. मलाही ओंकारनाथ ठाकूर, बापूसाहेब पलुस्कर, विनायकराव पटवर्धन यांच्या गायकीत रस वाटत नाही. थोरल्या पलुस्करांचं किंवा त्यांचे गुरु बुवासाहेब इचलकरंजीकर यांचं गाणं ऐकलेला आज़ कोणी हयात असेल असं वाटत नाही, म्हणून नंतरची पिढीच विचारात घ्यावी लागेल. पु ल याबाबत स्पष्ट बोलले, हे मला आवडलं.

    केसरबाईंच्या गायकीबद्‌दलही ती रूक्ष असल्याची टीका अनेक लोक करतात. मलाही ती गायकी रूक्ष वाटते. ही टीका पु लं ना माहीत नव्हती, असं नाही. त्यांना स्वत:लाही काही प्रमाणात तसं वाटत असेल. पण स्वभावानुरूप त्यांनी तो मुद्दा बाईंवरच्या लेखात मांडला नाही. दुसर्‍या एका लेखात (हिराबाईंवरचा किंवा माणिक वर्मावरचा किंवा अज़ून कुठला असेल) स्त्रीसुलभ कोवळेपणा केसरबाईंच्या आणि मोगूबाईंच्या गाण्यात कमी होता, हे त्यांनी मान्य केलं आहे. (मला स्वत:ला मोगूबाईंच्या गाण्यात मार्दव आहे, असं वाटतं.) पु ल नुसतेच थोर लेखक नव्हते तर विचारवन्तही होते. पण साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात त्यांनी टीकात्मक सूर लावण्याचा टाळून आस्वादकाची भूमिका पत्करली.

    संगीतात धर्म आणणार्‍या इतर कलाकारांवर पु ल खूश होते. संगीत नाटकात पौराणिक आणि धार्मिक कथानकांचा वापर होता. त्या परम्परेचे ते भक्त होते. कुमार गंधर्वांनी मीरा, कबीर, सूर, तुलसी आणि तुकाराम या पाच संतांच्या अनेक रचना प्रसिद्‌ध केल्या. शास्त्रीय संगीतातही अनेक धृपद आणि खयाल हे भक्ति वाङ्‌मयाकडे झुकणारे असतात. या सर्व गोष्टींबद्दल पु लं नी त्यांच्यावर टीका केलेली नाही. तेव्हा पु लं नी या विषयावर सातत्यानी एकच भूमिका घेतलेली नाही. विष्णु दिगंबरांबद्‌दलचे त्यांचे नक्की शब्द वाचल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही. कदाचित पु लं मधला निधर्मी समाज़वादी हा लेख लिहिताना उफाळून आला असेल. त्याबद्‌दलची तुमची टीका ५०% ते अगदी १०० टक्के बरोबर असेल. पण त्यांनी संघावर केलेली टीका तुम्हाला नको तितकी झोंबली, असा तुमचा लेख वाचून माझा अंदाज़ झाला आहे. पहिल्या दोन निनावी प्रतिक्रिया माझ्याच होत्या. काही टीका रास्त असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं , हे माझं मत मी पुन्हा इथे मांडतो.

    “If we say purpose of music is to enrich people’s lives, reach of music would definately matter.” हे कोणीही अमान्य करणार नाही. पण दर्जा खूप उंच राखतो असा आग्रह धरला तर सामान्य जन कलेला पारखे राहतात. आणि कला लोकांपर्यंत नेताना तिचा दर्जा कमी होतो. ही एक कसरत सर्वच चांगल्या कलाकारांना करावी लागते. आर डी बर्मन वगैरे फ़ालतू कलाकारांबाबत प्रश्नच नाही. ते त्यांच्या जगात मजेत असतात. ‘सध्याचं संगीत ऐकल्यावर मी या जगापासून पूर्ण वेगळा पडल्याची भावना मनात येते’ या आशयाचं विधान पु लं नी ‘एक शून्य मी’ या लेखात केलं आहे. थिल्लर कलाकारांना भरपूर चाहते असल्यामुळे ते असल्या तळतळाटाला भीक घालत नाहीत.

    ज़ाता ज़ाता अज़ून एक शेवटचा मुद्‌दा. धार्मिक किंवा निवृत्तीपर वृत्ती वाढून संगीताकडे लक्ष कमी झाल्याचा प्रकार त्या सुमारास इतरही काही लोकांनी केला होता. त्यामुळे संगीतक्षेत्राची हानी झाली, अशी हळहळ गोविन्दराव टेम्बे यांनी १९४० सुमारास व्यक्त केली होती. आणि विष्णु दिगंबरांचा खास उल्लेख केला होता. ही टीका पु ल २०-३० चे असताना पलुस्करांवर खूप झाली असल्यास ती आठवणही त्यांच्या मनात खोल बसली असेल. पण हा सगळा माझा ज़र-तर चा कयास. एकीकडे पु लं ना हिंदुत्ववाद्‌यांचा बराच रागही होता, आणि दुसरीकडे रामदास आणि शिवाजी ही हिंदूंची दैवतं त्यांच्या लहानपणी पार्ले भागातल्या फणसळकर मास्तरांचीही श्रद्‌धास्थानं होती, याचा त्यांना अभिमानही होता.

    – डी एन

 2. Anonymous said:

  ‘मैत्र’ हे पुस्तक अगदीच सामान्य आहे. पु लं च्या नावाला इतकी चलती आली होती की त्यांचं प्रसंगोपात छापल्या गेलेलं ज़वळज़वळ सर्व लिखाण पुस्तकरुपानी प्रसिद्‌ध झालं. भीमसेनचं तरी दुसरं काय झालं? त्याच्या कितीतरी गचाळ मैफ़िली कॅसेट आणि इतर रुपांत बाहेर आल्या. पण भीमसेननी आपल्या कलेशी ज्या प्रमाणात प्रतारणा केली (पैसे मिळतात, प्रसिद्‌धी मिळते, चमचेगिरी करायला लोक कायम तयार असतात, म्हणून हव्या तितक्या मैफ़िलींत चांगलं गाण्याचा प्रयत्नदेखील न करता गात सुटणे), तसा प्रकार पु लं नी कधीच केला नाही. कुठलाच लेखक प्रत्येक लेख त्याला शक्य असलेल्या उच्चतम पातळीवरून लिहीत नाही. त्यात कमीजास्त होणारच.

  • आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. पुलंचं बहुतेक लेखन हे चांगलंच आहे. पण मैत्र मधील तो लेख मला खटकला कारण तो एकांगी वाटला.
   एक साहित्यकृती म्हणून हा लेख वाईट नाही पण त्यातली मतं पूर्वग्रह दुषीत होती आणि म्हणून केवळ ‘त्या’ लेखासंदर्भात मी माझी मतं लिहिली आहेत.

   • anonymous ने दुसर्‍या वाक्यात जे म्हंट्लय त्यात बरेच तथ्य आहे. आज रोजी त्यांचे चिरंजीव लोकांना विनाकरण च पीळत असतात ? गाणं येत नाही हे जगजाहीर असून ही हे लोक का लोकांचा अंत पहातात तेच कळत नाही. २ वर्षापुर्वीची गोष्ट असावी, सवाईगंधर्व सं.म.सांगता समारंभाच्या वेळी फिरोज दस्तुर सह बाकी सगळी शिष्य मंडळी बसली होती गायला. भैरवी चा या सर्वांनी मिळून सारा विचका केला.दस्तूर अतिवृद्ध होते ते कोणीही समजू शकते,पण सगळे तरूण गायक होते ना? आणि याच सुमार गायकाना यावर्षी कुठले कुठले पुरस्कार मिळाल्याचे नुकतेच पेपर्मध्ये वाचले. असो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: