काही महत्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयांवरील मतं-मतांतरं

वाक्चौर्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ हि कादंबरी अपेक्षेपेक्षा फारच कमी खपली.  ‘हिंदू’ च्या एकूण चार कादंबऱ्याची मालिका निघणार होती. पण ह्या अपयशामुळे नेमाडेंचे पुढचे तीन भाग abort झालेत. त्यामुळे हे अपयश भरून काढायला पॉपुलर ने ‘कोसला’ ची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

 कोसला म्हणजे ‘अभिजात वाण्ग्मयीन चौर्यकर्म ‘ चा  उत्तम नमुना आहे. इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करून भारतीय  नावे  देवून  नेमाडेंनी पंचवीस  वर्षे मानधन खाल्ले. आता ३५० रुपयात नेमाडेंच्या ‘दुर्मीळ’ फोटोसकट नवीन आवृत्ती आली आहे (रविवर म टा ).

नेमाडे म्हणजे काय सत्य साई बाबा आहेत की शंकर महाराज ? पुस्तकाबरोबर नेमाडेंचा फोटो घेवून आम्ही  काय करायचं ?
मराठी प्रकाशकांची पातळी अशीच खालावत राहिली तर एक दीवस मराठी पुस्तकं  घ्यायची लाज वाटेल.Shame on you Popular Prakashan!

Advertisements

गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. आमच्या सारखे हजारो लोक जे रोज हिंजवडी भागात जातात त्यांना माहित आहे की   की .मी . अंतर कापायला ३० मिनिटांहून जास्त वेळ लागतो. रस्ता सुधारणे शक्य असून वर्षोनुवर्ष खराब रस्ते तसेच पडून आहेत. १५  वर्षांमध्ये MIDC ला येथे बस आगर बांधायला जमलेले नाही . हे सर्व केवळ स्थानिक राजकीय नेत्यांच्या  दबावामुळे सुरु आहे. आणि मुख्य म्हणजे आपण हे मुकाट्याने सहन करत आलोय.

आता येवू घातलेल्या निवडणुकांमुळे आपल्याला परिस्थितीत सुधारणा करण्याची सांडी चालून आली आहे. प्रथम स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसला विनंती करून आणि रस्ते न सुधारल्यास निवडणुकीत बहिष्काराची चेतावणी देवून आपण हिंजवडीमधील वाहतूक व्यवस्था सुधारू शकतो.

रस्ते रुंदीकरणाची विनंती करण्यासाठी आपण केवळ एक email (info@ncp.org.in) तर पाठवू शकता ना ? ह्या एका छोट्या प्रयत्नाने जर आपले रोज ३०  मिनिटं वाचणार असतील तर मग उशीर कशाला? आजच email पाठवा आणि अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/HinjewadiTraffic  ह्या संकेत स्थळावर भेट द्या .

आज गोध्रा  आणि गुजरात मधील दंगलींना १० वर्षे झाली.

त्यानिमित्त विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले गेले. पण मुळ मुद्दा कोणी जाणूनबुजून लक्षात घेत नाही.

दंगल उसळली कारण आगगाडीमध्ये काही लोकांना जाळून मारण्यात आलं होतं. गेल्या १० वर्षात किती मुसलमानांनी गोध्रा जळीतकांडाचा निषेध केला आहे?  ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की मुसलमान नेत्यांना-लोकांना जळून मेलेल्या भारतीयांबद्दल काहीएक सोयरसुतक नाहीये आणि त्यांना ही हत्या समर्थनीय वाटते?

दंगल ही वाईटच होती पण ती दोन्ही धर्माच्या लोकांनी केली होती हे विसरून चालणार नाही. वृत्तपत्रात मात्र तुर्की टोपी घातलेल्या एखाद्या  मुसलमान इसमाचे चित्र दंगलपिडीत म्हणून दिले जाते. हजारो हिंदूंची घरे त्या दंगलीत जाळण्यात आली, पण ती चित्रे कधी कुठे दाखवल्या गेली नाहीत. ५०० चा वर हिंदूंची कत्तल झाली पण त्यांची रडणारी मुले कोणा चित्रकाराला कधी दिसलीच नाहीत का?

सरते शेवटी एक मुद्दा- अफझल गुरु आणि कसब हे केवळ मुसलमान आहेत म्हणून त्यांना फाशी द्यायला सरकार टाळाटाळ करत आहे. ह्याचा एकही भारतीय मुसलमानाला राग येवू नये का? त्यांना फाशी द्यावी अशी मागणी कधी कोण्या मुसलमान नेत्याने कधीच का केली नाही?

 

धडा

 

फोडले कोणी थोबाड तरी शिकू नका धडा
मगरपट्टा आणि लवासात तुम्ही आपले खात रहा

मध्यंतरी भ्रष्टाचार विरोधी वातावरण तापलं होतं. त्या पार्श्वभुमीवर विविध क्षेत्रात होणाऱ्या (व्यवसायजन्य) भ्रष्टाचाराची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

सध्या पेट्रोल दर-वाढीने आपण त्रस्त असल्याने तेल क्षेत्र निवडूया. भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल ह्या प्राचीन गोष्टी असुन त्या आता जनमानसात रुळल्या आहेत. त्यामुळे भेसळ रहित तेलाची आपण अपेक्षा सुद्धा करत नाही. पण तेलाला भेसळीशीवाय आणखी अनेक रंजक पैलू आहेत.

थेंबे थेंबे तळे साचे- एक एक पॉइंट मारून महिन्याचा पगार काढणे ही पंपावरच्या लोकांची जुनी सवय. पण काही महत्वाकांक्षी कर्मचारी लिटर लिटर पेट्रोल मारतात. कार मधील लोकांचं लक्ष नसतांना पेट्रोलची नळी काढून जवळच्या डबकीत काही लिटर पेट्रोल भरून नळी पुनः गाडीच्या टाकीत टाकणारे महाभाग आहेत ( उदा. पुण्यातील चतुश्रींगी समोरील पंप). प्रत्येक गाडीत पेट्रोल भरतांना मागील गाडीच्या मीटर रीडिंग पासून सुरवात करण्याची परंपरा कर्वे पुतळ्याशेजारचा पंपावर आहे.

खाजगीतलं सार्वजनीक गुपीत- खासगी पंप ७० रु दराने खाजगी कंपन्यांचे पेट्रोल घेवून ७३ रु. लिटरने विकतात. सरकार आपल्याला अनुदान देते म्हणून सार्वजनीक कंपन्या (Indian Oil, HP, Bharat) ६५ रु.चे पेट्रोल आपल्याला ६७ रु. दराने विकतात. त्यामुळे काही व्यवहारी पंप मालकांनी त्यांच्या खाजगी कंपनीचे ७० रु. चे पेट्रोल घेण्याऐवजी सरकारी कंपन्यांचे ६५-६७ रु.चे पेट्रोल घेवून ते आपल्या नावावर (Essar/Reliance/Shell) ७३ रु.नी विकणे सुरु केले. ह्यावर कडी म्हणजे काही भाऊ-दादा लोकांनी एक खाजगी आणि एक सरकारी पंप आपल्या ताई-माईच्या नावावर घेऊन इकडचे पेट्रोल तिकडे असा उद्योग सुरु केला आहे. ह्याला म्हणतात बिझनेस माइंड!

कुणाच्या खांद्यावर कुणाचे आझे- पेट्रोल अति पेरीशेबल असल्याने एका ठिकाणहून दुसरीकडे नेतांना भरपूर पेट्रोल वाया जाते. पण ठआची जवाबदारी सगळे लोक पुढच्यावर टाकतात. ONGC जेव्हा भारत पेट्रोलीयमला १००० लिटर पेट्रोल पाठवते तेव्हा भारत पेट्रोलीयमला केवळ ९५० लिटर मिळते पण पैसे १००० लिटर चे द्यावे लागतात. मग भारत जेव्हा आपल्या पंपावर पेट्रोल पाठवते तेव्हा त्या ९५० चे ९०० लिटर झालेले असतात पण कागदोपत्री मात्र १००० लिटरची नोंद असते. हे ९०० लिटर पेट्रोल साठवून एकेका वाहनात भरतांना केवळ ८५० लिटर भरते. मग ह्या हरवलेल्या १५० लिटर पेट्रोलचे नुकसान भरून काढण्यासाठी भेसळ, मोजमापात अफरातफर असे उपद्व्याप केले जातात. आणि शेवटी पंपावर ह्या ८५० लिटर पेट्रोलची ११०० लिटर विक्री होते!

तर अशी आहे तेलाची गोष्ट. आपण त्यातल्या त्यात खात्रीच्या पंपावर पेट्रोल भरून स्वतःची गाडी वाचवू शकतो. बाकी काही करणं लोकशाहीत शक्य नाही.

पैसे कमावण्यापेक्षा पैसे योग्यरित्या गुंतविणे कठीण आहे ह्यात वाद नाही. पण ह्या कठीण कामात आपल्याला मदत (?) करणारे ‘आर्थिक सल्लागार’ हे काम आपल्यासाठी अधिक अवघड करून ठेवतात.

ही सल्लागार मंडळी कंपनीचे दलाल (मराठीत- एजंट) असतात. त्यांना अर्थव्यवस्थेची आणि भांडवलीबाजाराची केवळ वरवर माहिती असते पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असल्याने आपण त्यांना प्रमाण मानतो. आणि जिथे जास्त दलाली (सभ्य भाषेत- कमीशन) मिळेल तो गुंतवणुकीचा पर्याय ते आपल्याला विकतात. ह्याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे ULIP आणि जीवन विमा.

ULIP च्या नावावर विमा कंपन्यांनी मागील ७-८ वर्षात जो घोळ घातला त्याची कबुली स्वतः विमा कंपन्या agressive selling, misselling अश्या गोंडस शब्दांनी देतात. ULIP हे म्युचल फंड प्रमाणेच काम करतात फक्त ह्यात वार्षिक गुंतवणुकीच्या ५ पट जीवन विमा संरक्षण मिळते. पहिल्या वर्षी २५% ते ५०% प्रिमिअम अलॉंकेशन चार्जेस कापून (खावून) उर्वरित रक्कम गुंतवणूक म्हणून वापरणारी ही अजब स्कीम.

१० लाखाच्या विम्यासाठी ULIP मधे १ लाख ३० हजार इतके शुल्क पडते. LIC च्या टर्म प्लान मधे हेच शुल्क  केवळ ३० हजार पडते. आणि तरीही हजारो लोक (मी पण त्यातलाच) ह्यात फसले. आपण का फसलो आणि सरकारने जाणतेपणी आपली फसवणूक का होवू दिली हे थोडे मनोरंजक आहे:

आपण का फसलो?

ULIP   मधील गुंतवणूक कर सवलतीस पात्र होती. शिवाय ह्यात ३ वर्षांनी पैसे काढून परत गुंतवून त्यावर परत कर सवलत घेण्याची मुभा होती (withdraw-reinvest and claim tax benefit on reinvested amount!) त्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित झाले. एजंटला न भूतो न भविष्यति असं कमीशन होतं त्यामुळे त्यांनीही ULIP  हाच सर्वोत्तम पर्याय आहे असा प्रचार केला.

सरकारमान्य फसवणूक

विमा क्षेत्र खुले झाल्यावर अनेक खाजगी विमा कंपन्यांनी ह्यात प्रवेश केला. विमा हा दीर्घ मुदतीचा धंदा आहे आणि नफा कमवायला कित्येक वर्ष वाट पहावी लागली असती. पण देशभर ऑफिस आणि एजंटचे जाळे विणत असलेल्या कंपन्यांना आपला खर्च चालवत LIC शी टक्कर देणं केवळ अशक्य होतं. आणि म्हणून सरकारने भरगोस शुल्क असलेल्या ULIP  ला ‘दीर्घ मुदत गुंतवणूक’ असा दर्जा देवून कर सवलत दिली. आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी ३ वर्षानंतर पैसे काढण्याची पळवाट देखील तयार केली. उलट अशी स्कीम नसती तर खाजगी कंपन्या विमा क्षेत्रात येउच शकल्या नसत्या.

मधे SEBI ने ULIP  विरोधात रान उठवला होतं त्यामुळे आता ULIP  शुल्क बरेच कमी झाले आहे पण १० वर्षापर्यंत एक्झिट लोड आहे.  थोडक्यात ULIP  हा jack of both but master of none आहे. म्हणून ULIP  घेण्यापेक्षा जीवन विमा घेवून उर्वरित रक्कम म्युचल फंडमध्ये गुंतवणे अधिक चांगले.

 

गावाकडे आठवडी बाजारात लोक कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावत, जसे शहरात लोक घोड्याच्या शर्यतीवर लावतात. मी अजून तरी प्राण्यांच्या शर्यतीत, मटका, तिन पत्ते इ. ठिकाणी कधी पैसे लावलेले नाहीत. पण गेल्या काही वर्षातील आर्थिक गुंतवणुकीचा आढावा घेतला तर मी ‘हावरट माणसांवर’ पैसे लावून जुगार खेळलो असं वाटतं.

विमा , म्युचल फंड असो वा सोनं असो, गुंतवणूक पर्यायांची आपल्याला केवळ मर्यादित माहिती असते, आणि अधिक परतावा मिळावा म्हणून आपण एक प्रकारचा जुगारच खेळत असतो. गेल्या काही वर्षात मला आलेले अनुभव आणि मला समजलेलं गुंतवणूकीचं गुंतागुंतीचं गणित क्रमशः इथे मांडतो आहे:

सोनं ते सोनं –  सोन्यासारखी सुरक्षित गुंतवणूक नाही असं म्हणतात, अपवाद- chain snatching, घरफोडी 🙂  हल्ली सुवर्ण भिशी हा पर्याय बायकांमध्ये खूप प्रिय आहे. तुम्ही १२ महिने पैसे भरले की सराफ तुम्हाला १३ व्या महिन्याचा हफ्ता देतो आणि तुम्ही १३ महिन्याच्या रकमेवर दागिने घेता.

१२ महिन्यावर १ महिना म्हणजे तुम्हाला ८.३ % परतावा मिळतो. पण हे पैसे तुम्हाला दागिन्यांवर खर्च करावे लागतात ज्यात १०० रु. ग्राम मजुरी असते. दुसरं म्हणजे सोन्याच्या भावात वार्षिक १५ ते २५ % वाढ होते, म्हणजे भिसी सुरु करतांना आपण ५० ग्रामसाठी पैसे भरले तर भिसी संपतांना आपल्याला केवळ ४० ग्राम सोनं घेता येईल. आपल्याला वाटतं सराफांनी आपल्याला १ महिन्याचा हफ्ता दिला, पण प्रत्यक्षात आपला ३-४ महिन्यांचा हफ्ता वाया जातो.

मी जानेवारी २००९ मधे भिसी काढली, त्याऐवजी एकरकमी गुंतवणूक केली असती तर माझं नुकसान झालं नसतं:

म्हणून, सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास एकरकमी करावी. आणि नाणे घेण्यापेक्षा केवळ कागदोपत्री सोनं खरेदी करून ते सराफाकडे जमा ठेवावं. ह्यात coin making charges आणि locker charges वाचतात. गरज पडेल तेव्हा ही जमा पावती दाखवून सोनं/पैसे परत घेता येतील.

ज्यांना लग्नकार्यासाठी भरपूर सोनं खरेदी करायचं आहे आणि आज १-२ लाख गुंतवणे शक्य नाही त्यांनी भिशीच्या मार्गाने जावे. त्यातही ११ महिन्यांवर १ महिना देणारा सराफ बघावा (उदा. तनिश्क). १२ वर १ पेक्षा ११ वर १ जास्त फायद्याचं!

 

क्रमशः